top of page
Writer's pictureRaginee K

अभिव्यक्ती

आपल्या सगळ्यांच्या शरीरात तोच प्राणवायु संचारतो जो इतरांच्यामध्ये देखील असतो. इतकेच काय तर वारा, पाणी आणि सूर्याचे ऊन देखील तेच असतात. तरीदेखील प्रत्येक व्यक्ती आणी तीचे व्यक्त होणे सर्वस्वी वेगळे असते.



सकाळी सूर्य उगवला तर कोणी व्यायाम करते तर कोणी केस सुकवायला अंगणात तर कोणी कामावर जात असते. एखादीच कोणीतरी ती दैवी कृपा अंगावर घेऊन उल्हसित होऊन उत्कटतेने नर्तन करीत असते.



पंचमहाभूते आपापली कामे करीत असतात. सर्वाठायींचे एकाच चैतन्य मात्र जाणिवेच्या पातळींवर प्रत्येकात वेगवेगळ्या रूपात व्यक्त होते. जसेजसे संवेदनेची तीव्रता, शरीरातील आवेग आणि निसर्गाप्रती प्रेम एकत्र येतात तसे त्या सर्वांचे एक सुंदर रसायन शरीरातून किंवा औजारांमधून कलेच्या रूपात स्फुरत असते. आलेल्या अनुभवांची भावनेशी झालेली भेट म्हणजेच तर अभिव्यक्ती नव्हे ना !




Words & Photography : Yogesh Kardile

Muse : K Raginee Yogesh

All rights reserved.

70 views0 comments

Comments


bottom of page