top of page

कमलजा

Writer: Raginee KRaginee K


नितळ कांती आणी उत्कट आनंद यांचा संगम असलेली ती. कमलदलाच्या उमललेल्या गुलाबी पाकळ्या वाऱ्याच्या झोकावरती जश्या भुरभुरतात तसा स्वर्गीय विहार या धरातालावर मुक्तपणे करणारी. समृद्धी आणि संपन्नता यांचा संगम असणारी तुमच्या आसपासच असते. प्रत्येकीच्या आत सात्त्विकतेचा अविष्कार असणारी ती.



अंधाराच्या पार्श्वभूमीवर फुलपाखरागत रंगांची उधळण करणारी तुझ्यातलीच एक. वायु आणि आकाश तत्वांचा सुरेख मिश्रण असलेली तितकीच तरल हाताला न गवसणारी परंतु दृश्यमान होत सुखावणारी शक्ती कमलजा. अप्राप्य सुखाच्या मागे धावणाऱ्या मनुष्याला भौतिक सुखातुन अधिभौतिकतेतून अध्यात्माकडे नेणारी शक्ती. आयुष्यातील उदात्ततेची अनुभूती सूक्ष्मरुपातुन प्रत्यक्षात करून देणारी ती कमलजा तूच.




All rights reserved.

Write up & Photography @yogeshkardile

Muse , Concept art, Costume design & Fashion Styling : @k_raginee_yogesh


.

.

.

 
 
 

Commenti


bottom of page