top of page
  • Writer's pictureRaginee K

कला आणि कलाकार | Art & the Artist

Updated: Apr 8, 2023



गुहेतील भित्तिचित्रे, दगड दगडातील शिल्पे, कॅनव्हासवरील चित्रे आणि आत्ता काल परवा आलेली छायाचित्रे.

सगळ्यांमध्ये एक धागा समान आहे. मानव, निसर्ग आणि दैवी शक्ती यांचे चित्रीकरण आणि उदात्तीकरण. कदाचित आनंदासाठी, प्रसिद्धी, पैसा किंवा पुढच्या पिढीसाठी. परंतु वेगवेगळ्या विषयांमधून मानवी आकृती मात्र अजूनही कायम आहे.

Paintings on the prehistoric caves, sculptures carved from the rocks , paintings on canvas and photographs of the yesteryears all of them are connected by one thread. And that is the expression of creativity by sublimation and glorification of nature, humans and divinity.

Some do it for the sake of art, money, fame or for the next generation. But the human figure dominates our art in multiple ways since the beginning.





कला आणि काळ यांचे नाते बरेच गहिरे आहे. आज जी कला निर्मिती होते ती वर्तमानाच्या मूल्यांवर तपासली जाते. तर भूतकाळातील कलेला इतिहास म्हणून पहिले जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नसते. भूतकाळातील कलाकार वर्तमानातील कलाकारांशी कायम जोडलेला असतो. त्याचे कार्य हा वर्तमानाचा पाया असतो. अनुभव, संवेदना आणि अभिव्यक्ती ही ज्याची त्याची वेगळी असते. परंतु हजारो वर्षांपासूनची व्यक्त होण्याची भावना मात्र अगदी तशीच रक्तात वाहते जितक्या इतर नैसर्गिक प्रेरणा असतात.

Art and time have a unique relationship. The art that is being created today is looked through the moral compass of today's cultures. On the contrary the art done in the past is free from it and looked as a history. The artist from the past is always connected with the present artist. His / her work is always the foundation stone for today's artist. Everyone has a different sensibility , way of expressing and experiences. But since the beginning the urge of expressing remains the same coursing through our veins like blood. Just like any other urges this will be always there.





असेच या वर्तमानात दोघे एकत्र येऊन भूतकाळ आणि वर्तमानातून प्रेरित होऊन गेली काही वर्षे कला निर्मिती करीत आहेत. कदाचित आज ही छायाचित्र स्वीकारली जातील किंवा दुर्लक्षित होतील. कोणी त्याच्याकडे एखाद्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व, तर कोणी मुक्त अभिव्यक्ती म्हणून पाहतील. काळाच्या विस्मृतीत जाऊन पुन्हा एकदा ते वर येतील.


Similarly the duo is coming together inspired from the past creating art from a few years back. Maybe our work will be accepted or ignored by society. Some will consider it representation of culture or some as a free form of expression. This work will go into oblivion for sometime to resurface again.





निश्चितपणे तेव्हा दोघे येथे नसतील. त्या कामाकडे आजच्या बंधनांपासून मुक्त वेगळ्या दृष्टीने कोणीतरी ते पाहील. छायाचित्रातील निसर्ग आणि शरीरातील एकसंध झालेली लय, अवकाशातले रंग की कपड्यांच्या सुरेख घड्या यासारख्या विषयांचा एकत्रित किंवा वेगळा विचार होईल. नश्वर देहाच्या माध्यमातून शाश्वततेचा शोध घेता घेता कधीतरी तो पाहणारा छायाचित्राच्या पलीकडेदेखील जाईल. जग मात्र आपल्या चष्म्यातून पाहत नियमांमध्ये बांधण्याचा नेहमीच प्रयत्न करेल.


For sure they will not be here. society will reflect on the work free from the burden of that time period in a different light. The photography will tell something that we cannot see now. It might be the unification of the rhythm of nature and body or beautiful folds of cloth. Or an entirely different perspective. Finding out the eternal through the mortal body the viewer will transcend the photograph. Society will always try to frame it in a context best suitable for her.





कार्य पूर्ण झाल्यावर मात्र आपण कलानिर्मितीमधला आनंद घेऊन बाजूला जायचे. ब्रह्मांडातल्या आकाशगंगेसारखे अनंतात प्रवाहीत होत जायचे. न जाणो कधीतरी आपल्या कामाचे प्रतिबिंब कुठेतरी दिसेलही. अनंत ऊर्जा इकडून इकडे वाहत राहील आपण मात्र आपली काया विसर्जित केलेली असेल. प्रकाश, अंधार, त्वचा, कपडे, दगड, माती सारे काही एकजीव होऊन पुन्हा काहीतरी नवीन निर्माण होईल. हरवली नसेल ती लय ; अनंताची साथीदारीण.


When the work is done we must take the bliss out of creating the artwork and leave it for the society. Just like the galaxy in this Cosmos flowing free without worrying. You never know where the reflection of our work will be seen. The infinite energy will flow from one end to another and our mortal remains will disappear from the back of this work. Light, darkness, skin, clothes, rocks and soil everything will change its shape , may come together and form something entirely new. What will remain constant is the companion of eternity and that is Shakti.

1,144 views4 comments

Recent Posts

See All

4件のコメント


skhedlekar15
2023年4月05日

आपण ज्या कलात्मक्तेने एकेक छायाचित्र काढीत आहात त्याचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. आपल्या प्रत्येक छायाचित्रात अप्रतिम अशी कलात्मक दृष्टी आहे.

いいね!
Raginee K
Raginee K
2023年4月05日
返信先

आपल्या भारतीय कथांमधील आणि चित्रांमधील नायिका आणि तो परिसर लोकांच्या नजरेसमोर निसर्ग व वस्तूंच्या माध्यमातून मांडण्यासाठी आमचा हा एक प्रयत्न. आपल्या कॉम्प्लिमेंट्स बद्दल मनापासून धन्यवाद.

いいね!

mayurthakur34
2023年4月04日

Beautiful ❤️

いいね!
Raginee K
Raginee K
2023年4月05日
返信先

Thanks a lot.

いいね!
bottom of page