top of page

डोह आणि जलपरी | A nymph in the forest pool

Writer: Raginee KRaginee K



जंगलामध्ये सळसळणारा वारा झाडांना थोडे नाचवत पुढे सरकतो.

एका ठिकाणी मात्र त्याची चाल थबकते.

वाळलेली पाने वाऱ्याने खाली जमिनीवर न पडता एका डोहात पडतात.

कृष्णवर्णीय, नितळ आणि थंड असा तो डोह आपल्या तळाशी अनेक पानांना विश्रांती देतो.



Amidst the trees, a pond serene,

A nymph, so graceful, swims unseen,

Her hair afloat, like an engulfing night ,

A peaceful aura around her spread.



त्यातून सरसरत जाणारी एक आकृती शुभ्र वस्त्र ल्यालेली काळ्याभोर केसांच्या आड जिचा चेहरा झाकलाय.

दगडांवरून आणि तिच्या अंगाखांद्यांवरून पाण्याचा प्रवाह पुढे सरकतोय शांतपणे.

पाण्यामध्ये केसांची नक्षी आणि तिची लयबद्ध हालचाल.



No other soul, just nature's sound,

Birds chirping, leaves rustling around,

The nymph, she dives, then swims anew,

A blissful solitude, her only view.




पुन्हा एकदा झाडी जोरजोरात नृत्य करतात. पाने आणि फुले डोहात बरसतात.

गार वारा डोहावरून वर येतो ते तिचे गाणे वनराईत विखुरण्यासाठीच.

पण ती मात्र आता तिथे नसते. झाडांच्या सावलीत गूढरम्य असा डोह पुन्हा एकटाच.


The forest shields her from the world,

A tranquil heaven, where she's swirled,

In water clear, she's free to be,

A nymph, so wild, so pure, so free.


Words & Photography : Yogesh Kardile

Model : K Raginee Yogesh

All rights Reserved.

 
 
 

Comments


bottom of page