कोलाहलापासून दूर अशा वनामध्ये वसलेल्या वाड्या आणि वस्तीत राहणारी माणसे. माती आणि पाण्याशी जवळचे नाते सांगणारे. अश्या त्या लोकांमध्ये निसर्गात विहरणारी निसर्ग कन्या. तिच्यासारख्या अनेक या दऱ्या-डोंगरात आणि वनांमध्ये फुलून येथेच मिसळून जाणाऱ्या. त्याचे सोहोळे पाहतच मोठ्या होणाऱ्या. निसर्गाचे गुपित आणि मानवाच्या आदिमतेशी चित परिचित असणाऱ्या त्या. या भूमीशी घट्ट जोडल्या गेलेल्या.
Far from the madding crowd deep into the forests one can find settlements of forest dwellers. Living closely connected with the rhythm of nature. Attuned with the soil and water they spend their lives. She is one of them and there are women like her who take birth in the beautiful world and live their entire lives amidst nature.
निसर्गाचा घन गंभीर शांतता ते रौद्र नाद या सर्वाशी जुळवून घेत आयुष्य फुलविणाऱ्या. धरित्रीच्या कन्या आणि पहिल्या कृषक -सुद्धा. मानव वंशासोबत फळ फुलांच्या बागा आणि पिके फुलविणाऱ्या आद्य कृषक. सिंधू संस्कृतीच्या निर्मात्या; वनांमध्ये विहरणाऱ्या ते पुढे गाव आणि महानगरांच्या अस्तित्वास कारण असणाऱ्या निसर्ग कन्या.
She adjusts her life with the tune of nature , be it peaceful calm or the torrential beats of the storms. She knows the secrets of the forests like a primordial being. She is the daughter of the earth and the first farmer also. Creating and celebrating human life as well as crops and fruits in the backyard. She is the daughter of nature. A reason for the flourishing Sindhu civilisation thousands of years back. She is nature herself dwelling in the forest but the reason for thriving villages and cities.
Comments