Raginee K
निसर्ग कन्या

काळ्या पाषाणातून वाट काढीत खळाळणारे नितळ पाणी, डोईवर दोन्ही बाजूंनी गर्द वनराई आणि त्यातून झिरपणारे ऊन. अशा सुंदर वातावरणात रक्तवर्णी व सोनेरी काठांची साडी ल्यालेली ती. हिवाळ्याची नुकतीच सुरवात असल्यामुळे हवेत हलकासा गारवा.

आयुष्यात कधीतरी निवांतपणा फक्त स्वतःसाठी असावा आणि तो मनमोकळा उपभोगताना निसर्गात मस्त रमतगमत विहार करावा.अप्सरा कदाचित कल्पनाविलास असू शकतो. परंतु निसर्गाची साकार कलाकृती मात्र तीच. एखादे मनातले स्वप्न प्रत्यक्षात जगणारी ती निसर्गात असलेली निसर्ग कन्या.



