जगापासून दूर अरण्यात राहणारी ती. तिच्या सोबतीला आहे एक समृद्ध जंगल आणि तिच्यासारखीच एकटी नदी. अगदी नितळ आणि पारदर्शी.
Living far off from the known world she resides in the rich forest. And accompanied by a lone river just like her. Crystal clear water flowing from the shackles of civilization.
नित्य नूतन प्रवाही आणि समाज बंधनांपासून मुक्त. आपल्याच तालात निसर्गाच्या सुरात; कधी बागडत, कधी विश्राम घेत तर कधी त्याचे पूजन करीत. तिला ठाऊक नाहीत बंधने या जगाची. तिची नैतिकता बांधलीये या झाडांशी, वेली फुलांशी आणि वाहणाऱ्या पाण्याशी.
Dancing in her own tune, sometimes with full excitement or gently without notice. She worships the elements. Away from the morals of this world she celebrates every season with flowers and trees.
अखंड धरणीशी संबंध आणि आकाशाची सोबत. अजूनतरी तिचे आकाश स्वच्छ आहे. अजूनतरी मातीला येतोय सुवास आणि प्रवाह मुक्तपणे खळाळत आहेत. झाडांवरील फुले आणि फळे आजही जमिनीवर पडतात. प्राणी आणि पक्षी आजही सुखाने नांदतात.
Connected with the Gaia ( earth ) and sheltered by the sky. Fortunately her sky is still pristine blue and the soil leaves a fragrance with the first rain of every monsoon. River is unbounded flowing with full force, flowers and fruits showers on the forest floor. Birds and animals enjoy the riches of the forest.
हो वीज कधीमधी कडाडते तर कृष्णमेघ धुवाधार बरसतो. सूर्य देखील जमीन भाजून काढतो पण सगळे जंगल ही कृपा आनंदाने अंगाखांद्यांवर खेळवत तिला वाढवते.
But yes sometimes the thunder strikes onto the cliffs and dark clouds descend into the forest. Sun rays show no mercy but the forest accepts everything, still protects everyone and thrives. She is a fairy playing in her own world.
Photography & Writeup : Yogesh Kardile
Muse : K Raginee Yogesh
All rights reserved.
Comments