top of page

शुभ्रा

Writer: Raginee KRaginee K

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !



गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ! सुरेश भटांच्या या ओळी प्रत्येकाला लागू होतात. दैनंदिन जीवनात तेचतेच काम करीत आपण विसरून जातो कि खरेच मी कोण आहे. एखाद्या कार्यक्रमात आपण कितीही सजून गेलो आणि एखादी अस्वच्छ व्यक्ती अंगाला घासून गेली कि जसे कसे तरी होते. पण रोजच्या जगण्यात अनेकांचे विचार, कृती, तत्वज्ञान आपल्याला घासत प्रभावित करून आपण कोण आहोत हे ठरविते. पण मग मोकळा वारा, वाहणारे पाणी, सूर्याचे ऊन हे आपल्याला का नाही मुक्त करीत ?




कि आपणच त्यांच्यापासून या समाज नावाच्या व्यस्थेमुळे दूर होत जात, धर्म, लिंग, पद आणि प्रतिष्ठेने नव्या भिंती रचित जातो ? काय हवे असते कि ज्यामुळे आपण आपल्याच पासून दूर जातो? वेगवेगळी लेबले चिटकवून घेत सारे अंग झाकून टाकतो. मुक्त श्वास घ्यायचे विसरून मी म्हणजे कोणाची तरी आई , पत्नी , मुलगी , बहीण , करिअरिस्टिक स्त्री / गृहिणी यात बंदिस्त करतो. भय, निद्रा, आहार आणि मैथुन याच्या पलीकडे एक वाऱ्यासारखे चैतन्याचा प्रवाह म्हणून क्वचितच वावरतो. पण जर का कोणी तसे आपल्या आयुष्यात आले ; काही क्षणांकरिता का होईना आपल्या मनाला खोलवर त्या फुलपाखराचा रंग लागतो.





वाहणारा वारा स्वतःला मी कोण, कुठल्या धर्माचा, कोणाचा मित्र किंवा नातेवाईक म्हणून पाहत नाही. अंगातले अवसान संपेपर्यंत वाहत पानाफुलांना, पाणी, डोंगर, माणसे सर्वांना स्पर्श करतो. आपण सारे सारे जन्मतः जसे येतो तसेच जाणार असतो. मग मधल्या काळात काय निर्माण करतो आणि कसे जगतो ते जास्त महत्वाचे. नाही का ?



All rights are reserved.

Muse : K Raginee Yogesh

Photography : Yogesh Kardile


 
 
 

Comments


bottom of page