“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।”
संन्यासी आणि योद्धा हि परंपरा येथील मातीला नवीन नाही. जेव्हा केव्हा धर्म संकटात सापडतो. निसर्ग आणि प्रजेला त्रास होतो तेव्हा तेव्हा ही भारतवर्षाची माती तेजस्वी स्त्री आणि पुरुषांना जन्म देते. त्यामुळे हि जमीन फक्त अहिंसेचा प्रचार करणारी नाही तर सत्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी वेळ आल्यास साधूला देखील शास्त्रासोबत शस्त्र हाती घ्यायला लावणारी आहे.
मग ते राम असो, परशुराम असो, नागा साधू किंवा निहंग परंपरा असो. उदासीन वृत्तीने राज्य कारभार करणारे राजा जनक आणि राजमाता अहिल्यादेवी यासारखे संन्यस्त आणि वीर या भूमीने तयार केले. तर गुरु तेगबहादूर आणि संभाजी राजांसारखे थोर बलिदान देणारे देखील याच मातीत जन्मले. गुरु गोविंद सिंग यांच्या उपदेशाने संन्यास सोडून रणभूमी गाजविणारे बंदा बहादूर अशी अनेक उदाहरणे येथे देता येतील. जितके संसार त्याग करणारे महात्मे येथे पूजनीय आहेत तितकेच वीर आणि राजेदेखील. त्यामुळेच कित्येक संन्यासी परंपरा हाती त्रिशूल किंवा तलवार धारण करितात. तर राजे संन्यस्त वृत्तीने राज्यकारभार करतात आणि युद्ध देखील लढले.
अशा या परंपरेचा विसर पडल्याने आपले मन द्विधा अवस्थेत सापडले. नेमके काय खरे हा तरुणांना प्रश्न पडतो. तेव्हा फक्त डोळसपणे इतिहासाचा अभ्यास करून स्वतःला प्रश्न विचारायचा असे नेमके का घडले ? हरलो तर का आणि जिंकलो तर ते देखील का ? भूतकाळातील घटना वर्तमानकाळातील मापदंडांने न तोलता त्याकाळचा विचार करून अभ्यास करायचा.
वल्कले धारण करणारे प्रभू राम राज्य सोडून जरी गेले तरी वेळ आल्यावर न्यायासाठी सुग्रीवाच्या बाजूने उभे राहून वालीचा संहार करतात. रावणाचा गर्व हरण करून त्याचे वर्चस्व त्याच्या सैन्यासोबत समूळ नष्ट करतात आणि विभीषणास राजा बनवितात. राम हि एक वृत्ती आणि आदर्श तेथून पुढच्या पिढ्यात आणि भारताच्या रक्तात भिनला. आणि अनेक उदार, संन्यस्त व पराक्रमी राजे या भूमीने पहिले. अशी ही आसेतु हिमाचल असलेली भारतभूमी जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा संन्यस्त वृत्तीचे योद्धे निर्माण करिते. कारण पुरुषार्थ हा अन्याय आणि प्रतिकूल परिस्थितीशी लढण्यात असतो. शेवट तर सर्वांचाच अखेर होतो. परंतु इतिहासात नोंदी तो घडविणाऱ्यांच्या होतात. फोटोग्राफी : योगेश कर्डीले
मॉडेल : ऋषिकेश खेडकर
फॅशन स्टायलिंग : रागिणी कर्डीले
रिटचिंग आर्टिस्ट : यतीन शिंदे
सर्व हक्क राखीव.
अप्रतिम लिखाण. अतिसुंदर छायाचित्रण.