ज्या सोनेरी दगडांच्या मधून मध्ययुगात भारतीयत्व उत्कर्षाला पोहोचले ते विजयनगर साम्राज्य आजही जगभरातील लोकांना खुणावत आहे. त्या पाषाणांमधून वाट काढीत खेळत जाणाऱ्या तुंगभद्रेच्या काठावर शेती फुलविली.
हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगर साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवून या भूमीवरती स्वर्ग निर्मिला. पुढच्या काळात छत्रपती शिवरायांना देखील प्रेरणा दिली. कलाकाराच्या छन्नी आणि हातोड्यांनी येथे देवी देवता भूलोकी अवतरले. हिरे, मणिके यांच्या बाजारपेठेसोबतच संगीत आणि कलेचा परमोच्च अविष्कार याच जागी घडला.
ज्याला मुलगा मानले त्यानेच राजाचा विश्वासघात केला. सर्व काही ध्वस्त केले. तरीही त्याचे नाव काळाच्या पडद्याआड गेले. परंतु आजही येथील एक एक दगड सौंदर्याचा अविष्कार आहे.
ध्यान, योग आणि संगीत सादर करणारे जगभरातील प्रवासी, योगी व कलाकार न बोलविता येतात. जागेची व्हायब्रेशन्स किंवा ऊर्जा म्हणतात ती आजही तितकीच तीव्र आहे. म्हणूनच या देशास स्वर्ण आणि स्वर्गभूमी म्हणत असतील. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी ।।
Words & Photography : yogesh kardile
Muse : K Raginee Yogesh
All rights reserved.
Comments