पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये ऊर्जेचा अंश असतो. तर शरीरातील रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये पाणी असते. या विश्वातील शुद्ध ऊर्जा प्रकाश स्वरूप तर दुसरी पाण्याच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. या दोन्ही ऊर्जेच्या स्रोतांतून आपला प्रत्येक कणकण तयार झालाय. या शुद्ध ऊर्जेचे कमी अधिक स्वरूपात आपण वाहक आहोत.
ही वाहणारी नदी, तो धीरगंभीर समुद्र, तर डोंगरांवरून कोसळणारा जलप्रपात म्हणजे आपण स्वतःच. स्त्री आणि पुरुष या लिंगभेदांपलीकडे आपण फक्त ऊर्जेचे पुंजकेच. या पृथ्वी आणि सूर्याच्या आवर्तनात वेगवेगळ्या ऊर्जा प्रक्रियांमधून एका तेजाच्या थेंबापासून मोठे होत परत त्याच विश्वात विलीन होणारे. सृष्टीचा हा न संपणारा खेळ स्वतःचा म्हणून त्यात व्यग्र होणारे. कधीतरी जलप्रपात समोर उभे राहिले तर स्वतःची शुल्लकता किंवा एकमेकांमधली समानता प्रतिबिंबित होते.
मी कोण ह्या प्रश्नापेक्षा आपणच सर्वत्र आहोत हे उमगते. झाडावरचे ते पोपटी पान, सोसाट्याचा वारा, अंगावर पडणारे ते कोवळे ऊन, दगडांनाही मऊसूत करणारे ते हजारो वर्षांपासून पडणारे पाण्याचे थेंब आणि त्यासमोर उभी राहून स्वतःला भेटणारी सिंधू एकच. अहं ब्रम्हास्मि ।
सर्व हक्क राखीव.
अप्रतिम लेख आणि त्याला साजेसे....पुन्हा पुन्हा पाहत राहावे असे फोटो.....खूप खूप