top of page

Intoxicated बेधुंद

  • Writer: Raginee K
    Raginee K
  • Jun 3
  • 2 min read


A sky darkened with clouds,A wild wind roaring through,And the sea, raging in its own stormy rhythm. In that moody afternoon,The poet within me awoke. Wandering alone along the shore.


काळवंडलेले आकाश, रोरावणारा वारा व खवळलेला समुद्र. अशा त्या दुपारी माझ्यातला कवी जागा होऊन किनाऱ्यावर एकटाच भटकणारा मी.





No one around. Just the rain falling in waves upon the ocean. Each drop dances with purpose. While the waves, in resistance, try to push them away. Yet their union is inevitable. As I stand under my umbrella,Trying to protect myself; the sea and the rain together erase my footprints in the sand.


आसपास कोणीच नाही आणि पावसाच्या सरी समुद्रात कोसळू लागतात. एका तालात त्यांचे हक्काचे नर्तन समुद्रावर सुरु होते तर फणकाऱ्यात त्यांच्यापासून बाजूला होण्याचा प्रयन्त लाटा करतात.




Suddenly — a flash, not of lightning,But of her — soaking in the rain, Unbothered by the storm,Her wet hair flying like waves down her back. A splash of that water reaches me, And I shiver — not from cold, But from something deeper, unknown.


दोघांचे मिलन मात्र अटळ आहे. त्यांच्या वर्षावात मी मात्र स्वतःला वाचवीत छत्रीखाली रेतीत आपलीच पावले शोधतोय. कधी लाटा तर कधी पाऊस दोघे मिळून मात्र माझ्या पायखुणा बुजवून टाकताहेत.




The wind pulls her drape aside, And I don’t even realize. When my umbrella slips away. She disappears behind a black stone wall, But before she does, Her eyes meet mine — a moment frozen. In that instant, I forget everything.


इतक्यात अचानक लक्ख वीज चमकावी अशी ती ओलेती; लाटांची आणि पावसाची पर्वा न करीत मनसोक्त भिजताना दिसली. केसांच्या लाटा पाठीवरती उडविताना त्या पाण्याचा शिपका मात्र माझ्याकडे उडाला. का कुणास ठाऊक माझ्या अंगावरती सर्रकन काटा आला. पुढे वाऱ्याच्या झोतासरशी तिचा पदर ढळला आणि माझ्या हातातली छत्री केव्हा उडाली ते कळलेच नाही.



And as the next wave crashes, It soaks me completely —Water rushing into my nose and mouth,The ground beneath me slipping away.And then —A sudden gust throws open my window, Bringing the outside rain into my home. I wake up. It was all a dream.




कोसळणाऱ्या पावसासारखीच मुक्त ती काळ्या दगडाच्या भिंतीआड जाताना तिचा चेहरा आणि नजर माझ्या नजरेला भिडली आणि तिला पाहून सर्वस्व विसरून त्या क्षणात बंदिस्त होऊन जाणारा मी पुढच्या लाटेत नखशिखांत भिजलो. नाकातोंडात पाणी जाऊन पायाखालची जमीनच जणू सरकली. पाहतो ते काय वाऱ्याच्या वेगाने खिडकी उघडून बाहेरचा पाऊस घरात आला आणि माझे स्वप्न भंग पावले.



Words & Images : Yogesh Kardile

Muse : K Raginee Yogesh

Any form of usage like printing, re edit, manipulation, video, painting or illustration , sale etc ... is not permitted without explicit written permission.

Comments


bottom of page