top of page

लेहरीया

  • Writer: Raginee K
    Raginee K
  • Jan 22, 2024
  • 1 min read

ree

गार वाऱ्याच्या लहरी गवता सोबतच साडीशी लगट करीत जणु समुद्राचाच भास निर्माण करताहेत. साडी लपेटून चालणारी ती जणू एखादी गजगामिनीच. वाऱ्याच्या साथीने तरंगत जाणारी कवीकथेतील एखादी अप्सरा जशी अवकाशमार्गाहून धरणीवर आली असा तिचा हा भास या एकांत माळरानी होतो.


ree

निळ्या आकाशाखाली घनदाट वनराईच्या डोईवरती असलेला हा माळरानरूपी सह्यसडा वन्य आणि स्वर्गीय जीवांच्या मांदियाळीसाठी जसा खुला राहिला. काही क्षणाचा तो तिचा भास आणि पुन्हा ते माळरान आणि त्यावर राज्य करणारा मुक्त वारा. माझ्याकडे कॅमेऱ्यात बंदिस्त झालेली तिची प्रतिमा हीच काय ती या माळरानाची आठवण.


ree

Comments


bottom of page