top of page

शृंगार रस

  • Writer: Raginee K
    Raginee K
  • Jul 14, 2023
  • 2 min read

ree

पंचमहाभूतांनी बनलेले शरीर आणि त्यातील मन मात्र बांधले गेलेय नवरसांशी. आणि या सर्व रसांचा दाता व विनाशक सूर्य सतत आपल्यामध्ये या रसांच्या माध्यमातून कमी अधिक प्रमाणात चैतन्य खेळवत असतो. भगवंताने निर्माण केलेल्या या सृष्टीत कुठलीच गोष्ट वाईट असू शकत नाही किंवा चांगली देखील. आपल्या अनुकूल आणि प्रतिकूलतेच्या मापदंडांवर आणि स्थळ काळाच्या मर्यादेत तिचा अनुभव आपण वैयक्तिक किवां सार्वत्रिकरीत्या घेत असतो. समाजमान्यतेच्या गोष्टी सतत बदलत असतात. बदलत नाही ते जिसर्गाची लय, सौंदर्य आणि त्याविषयीची अनाम ओढ. आणि म्हणून बंधने ही फार काळ काम करीत नाही तर निसर्गाची लय स्वतःच आपली वाट शोधत आपला विलास करीत पुढे जात राहते.


ree

जी शक्ती आपल्याला वीर रसाचा अनुभव एखाद्या योध्यात दिसते तीच त्या योध्याला नजरेने घायाळ करणाऱ्या युवतीच्या नजरेत ( शृंगार रसात ) असते आणि तीच शक्ती अर्धोन्मीलित नेत्र असलेल्या शांत योग्याच्या करुणेत ( शांत रस ) पण असते. दगडांवर धडकणाऱ्या लाटा परिणामाचा विचार न करीता आपल्या गुणधर्माचे पालन करीत सामूहिकरीत्या वर्षानुवर्षे तो दगड झिजवून टाकतात आणि स्वतःदेखील संपून जातात. आगीवर प्रेम करणारा पतंग त्या ज्योतीत विलीन होतो. तसेच नेत्रकटाक्षाने घायाळ झालेला युवक स्वत्व विसरतो. क्षणिक का होईना सुखाची अनुभूती घेत शक्तीने निर्मिलेल्या मायेत गुरफटून जातो.


ree

तर समाजाचा मोठा वर्ग त्या शक्तीला घाबरून संपूर्णपणे शृंगार त्याज्य ठरवीत मनामध्ये मात्र तिच्या प्राप्तीची कामना करीत असतो. जे जे उत्तम, नैसर्गिक, सुंदर, लयदार त्या सर्वांत शृंगारच असतो. पावसाने धरती नटते. तिच्या मधून निर्माण झालेल्या वस्तूंमधून पशु पक्षी, फुलपाखरे आणि स्त्री पुरुष नटतात. निसर्गाची उत्कट अभिव्यक्ती म्हणजेच शृंगार. सजणे, विलास, कला सादरीकरण आणि पंच ज्ञानेंद्रियाने आनंद मिळवीत आयुष्याचा रसास्वाद म्हणजेच शृंगार. समत्वाच्या मार्गावरचा एक टप्पा म्हणजे नवरसांमधला शृंगाररस. या सृष्टीसोबतच व्यवहार करताना ज्या देहात आपण वास करतो त्याची पूजा म्हणजे शृंगार. हो फक्त तिथेच अडकून न राहता पुढची पायरी चढण्यासाठीचा आधारदेखील तोच.


ree

Creative Direction, Write up & Photography : Yogesh Kardile

Muse & Fashion styling : K Raginee Yogesh

All rights reserved.


Comments


bottom of page