top of page

संक्रमणाचा उत्सव  : मकर संक्रांत

  • Writer: Raginee K
    Raginee K
  • Jan 14
  • 1 min read



पावसाळ्याचा अवखळपणा जाऊन वातावरणातील रुजलेली थंडी. हालचाली गोठविणारी निळीशार पहाट आणि नदीवरती पोहणारी धुक्याची अजून एक नदी. सूर्याच्या पहिल्या किरणासोबतच वितळत वातावरणाशी एकरूप होत आसमंत पवित्र करणारे जल त्या मंदिराला साक्षात स्वर्गरूप प्रदान करते.



काळ्या पाषाणाला जिवंत करणारे ते हात पंचतत्वात विलीन झाले तरी रोज सूर्यकिरणांच्या रूपात पुन्हापुन्हा त्याच्या सर्वांगाशी खेळत त्याला जल स्नानसोबत सूर्य स्नान देखील घडवितात.



आणि एके दिवशी अचानक हेमंत ( हिवाळा ) संपून शिशिरात संक्रमण होते. अशा या संक्रमणाचा आज हा उत्सव. निसर्गचक्राशी उत्सव जोडणाऱ्या मातृ- संस्कृतीचा आजचा हा आनंददायी दिवस. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.


Muse : K Raginee Yogesh

Words & Images : Yogesh Kardile


By accessing this content, you agree to not download, screenshot, redistribute, repost, alter, illustrate, paint, trace, use as reference, manipulate, or share it in any form publicly or privately without my prior, written permission.

This includes:

  • No AI training or replication

  • No use in mood boards, NFTs, edits, or fan art

  • No sharing via messaging apps or forums

  • No re-uploads on social media or other platforms

  • No sketches, derivative illustrations, or studies based on this work

This space is sacred. Violations will lead to an immediate ban and legal action if needed. Thank you for respecting the spirit and sanctity of this intimate creative space. 🙏🏽

Comments


bottom of page